गंगापूर, (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने रविवारी (दि. १९ जुलै) रोजी तालुक्यातील ढोरगाव येथील एका पान सेंटरमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पानमसाल्याचा साठा करून विक्री व पुरवठा केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख २२ हजार ६७० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पानमसाला जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या फिर्यादीवरून सिराज सय्यद, सोहेल सय्यद (दोघे रा. सिल्क मिल कॉलनी, संभाजीनगर), प्रभाकर किसन साळुंखे (रा. लिंबे जळगाव, ता. गंगापूर), मुक्तार सय्यद रा. ढोरेगाव, ता. गंगापूर), अश्रफ अहमद मिर्झा (रा. भारतनगर, वाळूज, ता. गंगापूर), अशी आरोपींची नावे आहेत. पाच जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित तंबाखूजन्य पानमसाल्याची विक्री, साठवणूक व पुरवठा केल्याचे निदर्शनास आले. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हवालदार व्ही. एल. पाखरे यांनी केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली, गुन्हे शाखेचे सपोनि संतोष मिसाळ, पोउनि लहू घोडे, पोलिस हवालदार शिवानंद बनगे, सचिन सोनार, विजय धुमाळ, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात आणि पोलिस चालक शिवाजी मगर यांच्या लिंबे जळगाव परिसरातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पानमसाला व गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करून त्याची जिल्हाभर विक्री व पुरवठा केला जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत लाखो रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त झाल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
संयुक्त लिंबे जळगावातून गुटख्याचा जिल्हाभर पुरवठा ?
या प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून आणि कोणाच्या माध्यमातून केला जातो, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करीत आहेत.












